आरे मेट्रो कारशेडला विरोध दर्शवण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या घरावर काँग्रेसचं आंदोलन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईतील आरे जंगलात सुरु असलेले मेट्रो कारशेडचे काम थांबवण्यासाठी पर्यावरण प्रेमींसह आता राजकीय पक्षही मैदानात उतरत आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाकडून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आरे मेट्रो कारशेडला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
तर यावेळी पर्यावरणप्रेमींसोबतच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनासाठी जमण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात सत्ता बदलानंतर शिंदे फडणवीस सरकारने मुंबईतील आरे मेट्रो कारशेडच्या कामकवरील बंदी हटवली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली होती.
या मेट्रो कारशेडमुळे अनेक झाडे तोडली जातील, पर्यावरणाला धोका निर्माण होईल त्यामुळे पर्यावरण प्रेमी याला विरोध करत आहेत.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….