एकनाथ शिंदे कधी काय बोलतील याचा नेम नाही :- खडसे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे कधी काय बोलतील याचा नेम नाही. नेमकं कळत नाही 50 आमदारांना घेऊन दहीहंडी फोडली.
म्हणजे त्यांनी शिवसेनेमधून पन्नास आमदार फोडले? बंडखोर आमदारांच्या माध्यमातून त्यांनी सरकार स्थापन केलं. ते काय बोलतात त्यांचा अर्थ कळत नाही,असं राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले आहेत. शिवाय भावनेच्या भरात जाऊन शिंदे सरकारने निर्णय घेणे आणि घोषित करणे काही योग्य नाही.
गोविंदा पथकाला पाच टक्के आरक्षण देणे कुठल्या आधारावर देणार आहे. अलीकडे नोकऱ्यांमध्ये काही आरक्षणाला निकष आहे ते राज्य सरकारने ठरवलेले आहे. काही शैक्षणिक पात्रता आणि अनुभव काय असणार आहे? क्रीडा विभागाचे काही नियम आहेत क्रीडा विभागाच्या मध्ये हा नियम बसत नाही. अन्य बाबींवर काय परिणाम होईल याची काळजी घेणं महत्वाचं आहे. आरक्षण द्यायचं असेल तर काही निकष वेगळ्या मार्गाने दिले पाहिजे, असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….