नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार :- कृषी मंत्री अब्दुल सत्तार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 19 ऑगस्ट :- अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असा दिलासा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिला.
यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे अभिमान लक्ष्मण बोभाटे यांच्या शेतात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत आमदार अशोक उईके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, तहसीलदार रविंद्र कानडजे, गटविकास अधिकारी बी. के. पवार, रंजन कोल्हे तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
कृषी मंत्री यांनी स्थानिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व खरडून गेलेल्या शेतात आता लवकर पीक घेता येणार नसल्याने होणाऱ्या नुकसानीची जाणीव असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व बाबींचा विचार करून शासनाकडून मदत करण्यात येईल याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. शेतात घुसणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी स्थानिक स्तरावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार अशोक उईके यांनी राळेगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीची माहिती कृषी मंत्री यांना दिली. तहसीलदार रवींद्र कानडजे यांनी नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर केला असल्याचे सांगितले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….