एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यत पोहचवावा :- जिल्हाधिकारी अमोल येडगे ; पुसद प्रकल्प कार्यालयात घेतला विविध योजनांचा आढावा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 18 ऑगस्ट :- पुसद येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास जिल्हाधिकारी, अमोल येडगे यांनी आज भेट देवून प्रकल्प कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. पारधी विकास योजना, स्वाभिमान व सबळीकरण योजना, घरकुल योजना यांची तात्काळ अंमलबजावणी करुन गरजू आदिवासी व पारधी लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत निर्देश दिले.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे व प्रकल्प कार्यालयाचे इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी आदिवासी विकास प्रकल्पामार्फत राबविण्यात येणाऱ्या तसेच प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविणे व शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी प्रकल्प कार्यालय, शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहे येथील भुसंपादन व बांधकामाबाबत आढावा जिल्हाधिकारी यांनी घेवून आवश्यक त्या सूचना दिल्या. जिल्हा वार्षिक आदिवासी योजनेंतर्गत कामांची अंमलबजावणी संबंधीत यंत्रणांकडुन व्यवस्थीतरित्या होत आहे किंवा नाही याची तपासणी करुन प्रकल्प अधिकारी स्तरावर याबाबत नियमित आढावा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….