तुपटाकळी येथील 48 गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण ; ढोले बहुउद्देशिय संस्थेचा उपक्रम….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :- येथील दिनबाई शाळेचे माजी मुख्याध्यापक स्व. महादेव ढोले यांच्या नावाने सामाजिक संस्था स्थापन करण्यात आली असून संस्थेच्या वतीने नुकतेच तुपटाकळी येथील हायस्कूल मध्ये इयत्ता 5 वी ते 10 वीत शिकत असलेल्या 48 गरजवंत विद्याथी, विद्यार्थिनींना मोफत गणवेशाचे वितरण करण्यात आले.
सामाजिक संस्थेकडून मोफत गणवेश वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुपटाकळी येथील डॉ ए डी अत्तेवार हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर भगत होते. प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला स्व. महादेव ढोले सरांच्या पत्नी व सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती शालिनी ढोले, डिव्हीएसपी मंडळाचे सदस्य तथा सामाजिक संस्थेचे सचिव सेवानिवृत्त मुख्याध्यापक अजय ढोले, तुपटाकळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक व शिक्षक उपस्थित होते.
समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्यांना आवश्यक ती मदत देण्याचे कार्य माजी मुख्याध्यापक स्व. महादेव ढोले सर आपले आयुष्यभर करीत आले आहेत. हेच कार्य या संस्थेच्या माध्यमातून यापुढे चालविले जाईल. गरजूंचा शोध घेऊन त्यांना आवश्यक असेल ती मदत देणे याच उद्देशाने ही संस्था निर्माण झाली आहे. मुलांना शिक्षणात मदतीचा हात देवून त्यांना शिक्षण पूर्ण करण्यात सहकार्य करण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद शर्मा यांनी तर आभार आनंद शिरभाते यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन सुजाता जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अत्तेवार हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शाळेचे इयत्ता 5 वी ते 10 वीचे विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

लाडकी बहीण योजनेच्या मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट ; ‘या’ दिवशी ३००० रुपये खात्यात जमा होणार…?
बारामतीत सुनेत्रा पवारांची ‘एकतर्फी’ घोडदौड; अभिजीत बिचुकले, करूणा शर्मांच्या एकूण मतांपेक्षा ‘नोटा’ भारी, पाहा कोणाला किती मते..?
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….