जन आधार नसलेल्या लोकांना आमदार इंद्रनील नाईक यांनी कवटाळल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान मोची समाजाचे नेते सुरज कुरील यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश ; प्रवेशानंतर आमदार निलय नाईक यांनी भाजपाची विचारधारा घराघरात पोहोचविण्याचे दिले आदेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथील मोची समाजाचे नेते सुरज कुरील हे मागील काही महिन्यांपासून पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक हे जनसामान्य कार्यकर्त्यांना विचारात घेत नाही म्हणून नाराज होते त्यांनी पुसद विधानसभेचे माजी आमदार तथा माजी मंत्री मनोहर राव नाईक यांनी विधानसभेच्या निवडणुकी वेळी घेतलेल्या सहविचार सभेतील श्री मनोहरराव नाईक यांच्या भाषणाने प्रभावित होऊन असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता त्यावेळी माजी मंत्री श्री मनोहरराव नाईक यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना भावनिक साथ घालत माझ्या इंद्रनील नाईकांना सांभाळून घ्या असे आवाहन केले होते.

तेव्हापासून मोची समाजाचे नेते सुरज कुरील यांनी नाईकांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख निर्माण केली होती परंतु इंद्रनील नाईक आमदार झाल्यापासून त्यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलने सुरू करून जन आधार नसलेल्या लोकांना कवटाळने सुरू केल्याने निष्ठावान कार्यकर्त्यां मध्ये संताप निर्माण झाल्याने पुसद येथील मोची समाजाचे नेते सुरज कुरील यांच्या नेतृत्वात आमदार निलय नाईक व भारतीय जनता पक्षाच्या अन्य नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे,यावेळी यादव हाटे, बाबूराव,पाईक राव,बंडू कांबळे, महेश मांडवगडे, रामराव कांबळे, गणेश शिंदे,यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे,

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….