“एकनाथ शिंदे उद्याना”चं खुद्द त्यांच्याच हस्ते होणारं उद्घाटन रद्द….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुण्यात एकनाथ शिंदे उद्यानाच्या उद्घाटनाचा घाट घालण्यात आला होता. मात्र स्वयंसेवी संघटना तसंच सकाळने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा कार्यक्रम आता रद्द कऱण्यात आला आहे.
चुकीच्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित केल्याने अखेर हा कार्यक्रम रद्द करण्याचे नामुष्की आली आहे.
हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.पुण्यातील हडपसर परिसरात महापालिकेच्या जागेवर हे उद्यान उभारण्यात आल आहे. शिंदे समर्थक आणि माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव दिलं. उद्यानाची जागा महापालिकेची असली तरी त्यासाठीचा खर्च आपण स्वतः केल्याचा दावा भानगिरे यांनी केला होता.
या प्रमाणे घरातील रहिवासी आणि महापालिका आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्यानाला शिंदे यांचे नाव देण्यास सहमती दर्शवण्यात आली होती असंही त्यांचं म्हणणं आहे. असं असलं तरी या नामकरनाला प्रशासकीय मान्यता नाही, त्यामुळे आजचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे.
याच परिसरात उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाचे उद्घाटनही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार होतं. मात्र महापालिका प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता हा कार्यक्रम ठरवण्यात आला होता. तसंच कोणताही प्रोटोकॉल पाळला नसल्यानं या फुटबॉल मैदानाचं उद्घाटनही रद्द कऱण्यात आलं आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….