त्या 12 खासदारांचे निलंबन करा ; संजय राऊत यांची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील वाद सुरुच आहे. आता या वादात संघर्षाची आणखी एक ठिणगी पडली आहे.
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटात काही दिवसांपूर्वी सामिल झालेल्या 12 खासदारांचं निलंबन करा, अशी मागणी लोकसभा खासदार ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे.
खासदार राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. राऊतांनी या भेटीत लोकसभा अध्यक्षांना पत्राद्वारे निलंबनाची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेची साथ सोडत 12 खासदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता.
दिल्लीत 19 जुलैला दुपारी शिवसेनेच्या 12 खासदारांची ओम बिर्ला यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत ओम बिर्ला यांना राहुल शेवाळे आणि भावना गवळी यांच्या अनुक्रमे गटनेता आणि प्रतोदपदी नियुक्तीबाबत पत्र देण्यात आलं होतं. यानंतर बिर्ला यांनी ग्रीन सिग्नल दिला.
त्यानंतर आता राऊतांनी या 12 खासदारांना निलंबित करण्यासंदर्भात मागणी केली आहे. त्यामुळे आता ओम बिर्ला काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
शिंदे गटाला पाठिंबा असलेले शिवसेनेचे 12 खासदार….
राहुल शेवाळे, भावना गवळी, कुपाल तृपाणे, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे, राजेंद्र गावित आणि डॉ. श्रीकांत शिंदे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…