संसदेत स्मृती इराणी वर सोनिया गांधी संतापले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अधीर रंजन चौधरी यांनी ‘राष्ट्रपत्नी’ संबोधल्याने झालेला गोंधळ थांबत नाही आहे. सभागृहाचे कामकाज तहकूब करून सोनिया गांधी बाहेर येत असताना भाजप खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली.
स्मृती इराणी बोलल्या असता सोनिया गांधी भडकल्या. मला तुमच्याशी बोलायचे नाही, सोनिया गांधी म्हणाल्या. प्रत्युत्तरात स्मृती इराणीही काही बोलल्या. यामुळे सुमारे दोन मिनिटे दोघांमध्ये वादावादी झाली.
‘राष्ट्रपत्नी’वरून भाजपकडून (BJP) राज्यसभा व लोकसभेत बराच गदारोळ झाला होता. यानंतर सभागृहाबाहेर सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात जोरदार वादावादी झाली. सोनिया गांधी यांनी भाजप खासदार रमा देवी यांना अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितली असे सांगितले. दरम्यान, स्मृती इराणी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता सोनिया गांधी भडकल्या.
संसदेत विरोधक व सत्ताधारी यांच्यात कटुता वाढली असून, दुरावा निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्मृती इराणी संसदेतही या मुद्द्यावरून आक्रमक झाल्या होत्या. अधीर रंजन चौधरी यांनी सोनिया गांधी यांच्या परवानगीनेच असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सोनिया गांधींनी स्वतः देशाची माफी मागावी, असे स्मृती इराणी (Smriti Irani) म्हणाल्या.
आज लोकसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी असभ्य आणि अपमानास्पद वर्तन केले. स्पीकर याचा निषेध करणार का? नियम फक्त विरोधकांसाठी आहेत का, असा प्रश्न काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.
गदारोळ का झाला?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’ म्हटल्याने संसदेत मोठा गदारोळ झाला. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी दिल्लीत पक्षाच्या निदर्शनादरम्यान राष्ट्रपतींसाठी हा शब्द वापरला होता. भाजपने आता हा मुद्दा बनवला आहे. संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसने यासाठी देशाची माफी मागावी, असे स्मृती इराणी म्हणाल्या.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….