मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर ; चंद्रकांत पाटलांची भेट घेणार…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोल्हापूर :- भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आईंचे काल, रविवारी निधन झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सोमवारी नवी दिल्लीहून कोल्हापूरला येत आहेत.
दुपारी २ वाजता मुख्यमंत्री शिंदे विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी ४ वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तिथून ते छत्रपती संभाजीनगर परिसरातील पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचतील. सायंकाळी ५.१५ वाजता मुख्यमंत्री पुन्हा विमानाने मुंबईकडे रवाना होतील.
आमदार पाटील यांच्या आई सरस्वती पाटील (वय 91) यांचे काल, रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. रात्री त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार पाटील यांच्या आईने कष्टातून त्यांचे जीवन फुलवले होते.