आजी-माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर ; ठाकरे-शिंदे राज्यभर फिरणार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर हा शिंदेंचा पहिलाच महाराष्ट्र दौरा असणार आहे. तर उद्धव ठाकरेही महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
शिवसेनेतल्या बंडानंतर आता उद्धव ठाकरेही सावध झाले आहेत. शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी आता ठाकरेंनी कंबर कसली आहे. आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रेवर आहेत. तर उद्धव ठाकरेही महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ठाकरे शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौरा करत राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. कालच मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. दिल्लीमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटले. या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा झाल्याचीही माहिती हाती येत आहे.
दरम्यान, या दिल्लीवारीनंतर शिंदे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले आहेत. दादा भुसे, शहाजी बापू पाटील, सदा सरवणकर, संजय शिरसाठ, विजय शिवतारे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आहेत. मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार मुख्यमंत्र्यांकडे गेले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत अजून ही स्पष्टता नसल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये धाकधूक आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…