राष्ट्रपती निवडणुक निकाल ; खासदारांची मतमोजणी पूर्ण ; द्रौपदी मुर्मू आघाडीवर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राष्ट्रपती निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. यामध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मोठ्या प्रमाणावर मतदान झाले आहे. मुर्मू यांनी युपीएचे यशवंत सिन्हा यांच्यावर आघाडी घेतली आहे.
द्रौपदी मुर्मू यांना खासदारांची ५४० मते मिळाली आहेत. तर सिन्हा यांना २०८ मते मिळाली आहेत. मुर्मू यांना मिळालेल्या मतांची व्हॅल्यू 3,78,000 तर सिन्हा यांना मिळालेल्या मतांचे मुल्य 1,45,600 एवढे होत आहे.
एनडीएकडे असलेल्या खासदारांच्या संख्येपेक्षा जास्त मते मुर्मू यांना मिळाली आहेत. यामुळे विरोधकांची मते फुटल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे.

आता विविध राज्यांच्या आमदारांच्या मतांची मोजणी सुरु होणार आहे.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलैला मतदान घेण्यात आले. देशाचे नवे राष्ट्रपती २५ जुलै रोजी शपथ घेतील. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. १८ जुलैच्या मतदानात संसदेत ७२८ जणांनी मतदान केले. त्यात ७१९ खासदार आणि ९ आमदारांचा समावेश होता. या आमदारांना संसद भवनात मतदान करण्याची परवानगी मिळाली होती. एनडीएचे घटक पक्ष व अन्य प्रादेशिक पक्षांनी दिलेला पाठिंबा लक्षात घेता या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…