शिवसेना शिंदे गटाच्या दोन खासदारांना मोदी मंत्रीमंडळात लॉटरी लागणार….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- शिवसेनेच्या आमदारांप्रमाणे शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिवसेनेचे ४० आमदार घेऊन बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांना भाजप ने राज्यात मुख्यमंत्री केलं. आता केंद्रात १२ खासदार घेऊन भाजप सोबत गेलेल्या एकनाथ शिंदे गटाला केंद्रात मंत्री पद मिळणार का?
असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाला एक केंद्रीय मंत्री पद आणि दोन राज्यमंत्री पद किंवा दोन कॅबिनेट मंत्री पद (दोन्ही पैकी एक) दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या खासदारांनी लोकसभेतील गटनेते पद राहुल शेवाळे यांच्या कडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर शेवाळे यांच्याच गळ्यात केंद्रीय मंत्री पदाची माळ पडण्याची शक्यता आहे.
दिल्लीमध्ये या १२ खासदारांचं मॅनेजमेंट एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे करत आहे.
यांच्या सोबतीला दिल्लीतील भाजप कार्यालयात बसणारा महाराष्ट्रातील एक बडा नेता देखील असल्याचं समजतंय.
रात्री राजधानी दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी या खासदारांची सदिच्छा भेट घेत त्यांच्याशी बातचीत केली. या बातचीत दरम्यान शिंदे गटाला काय दिल्लीत काय मिळणार? यावर चर्चा झाली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…