अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदी ॲड. शिवाजीराव मोघे यांची निवड…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- आर्णी–केळापूर मतदार संघाचे माजी आमदार व माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे यांची अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय काँग्रेस कमेटीतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी एका आदेशाद्वारे सदर नियुक्ती केली आहे. मोघे यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. फुले-आंबेडकरी साहित्य संसदेचे अध्यक्ष किशोर भगत यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले आहे.
काँग्रेस पक्षाने राज्यात पक्षबांधणीला सुरुवात केली असून, राज्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. ॲड. शिवाजीराव मोघे यांनी अनेक वर्षे राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेले आहे. तसेच ते काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रीय स्तरावर आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून आदिवासींचे मोठे संघटन त्यांनी केले आहे. म्हणूनच त्यांच्यावर पक्षाने राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी सोपवून आदिवासी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मध्यप्रदेशचे दीपक बाज यांच्याकडे अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस कमेटीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे देशपातळीवर आदिवासींसाठी विकासात्मक कामे करण्याची संधी मिळाल्याचे ॲड. मोघे यांनी सांगितले.

अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडून पुरस्कार परत, पुण्यातील ‘टीडीआर’ प्रकरणी नाराजी ; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय….!
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी…
सोलापूरचा महेंद्र ‘हिंद केसरी’; थारसह पटकावली चांदीची गदा, पुण्याचा पृथ्वीराज उपविजेता…..
महाराष्ट्र सरकारचा मोठा डिजिटल निर्णय; मंत्रिमंडळ बैठकींना आता ‘ऑनलाईन’ हजेरीची मुभा….
महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे पडघम; विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा, मतदारसंघांची संपूर्ण यादी…
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, लातूरमधील नामांकित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात…