हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पक्ष सोडला , मग मंत्रीपदांसाठी भांडणे का….? ; खडसेंचा टोला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जळगाव :- शिवसेनेने हिंदुत्व मुद्दा सोडला त्यामुळे आम्ही त्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो आहोत, असा दावा बंडखोर आमदारांनी केला आहे.
जर त्यांचा हिंदुत्वाचाच मुद्दा आहे तर मग आता मंत्रिपदासाठी हेच आमदार भांडणे का करीत आहे, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी आज येथे लगावला.
जळगाव येथे शुक्रवारी (ता.१५) पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले, की हिंदुत्वाच्या मुद्यावर बाहेर पडून त्यांनी भाजपशी युती केली, की उद्धव ठाकरे यांच्यावरच्या नाराजीमुळे पक्ष सोडला. आमचे विकास कामे होत नाही म्हणून आम्ही बाहेर पडतो आहोत असे सांगण्यात आले.
अशी वेगवेगळी कारणे प्रत्येक आमदाराकडून सांगण्यात आली. त्यांच्या पक्ष सोडण्याच्या कारणांबाबत कुठेही एकमत दिसलेले नाही. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा महत्त्वाचा मानला तर आता या बंडखोर आमदारांनी मंत्रिमंडळात आम्हाला घ्या हे सांगण्याची काही गरजच नाही. हिंदुत्वावर आले ना, मग हिंदुत्व हेच तुमचे ध्येय असले पाहिजे.
मग त्यासाठी मंत्री कशाला व्हायला पाहिजे. त्यामुळे या बंडखोराचा हिंदुत्व हा केवळ सांगण्यासारखा प्रकार दिसतो आहे. त्यांचे पक्षातून बाहेर पडण्याचे अनेक वेगवेगळे मुद्दे असल्याने त्यांच्या कोणतेही एकमत नसल्याचे दिसत आहे. आता त्यांनी पक्षातून बाहेर पडल्याचे कारण सांगताना एकमत करण्याची गरज आहे.
तात्पुरती स्थगिती असावी
राज्यातील सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या नियमाला दिलेल्या स्थगितीबाबत बोलताना ते म्हणाले, की कोणतेही नवीन सरकार आले तर ते जुन्या सरकारच्या कामांना स्थगिती देते.
परंतु या ठिकाणी काही निर्णयाला स्थगिती दिली ती तात्पुरती असावी, असे मला वाटते कारण औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्यास दिलेली स्थगिती दिलेली तात्पुरती असावे, असे मला वाटते कारणे हे प्रश्न अत्यंत भावनिक असतात.
त्यामुळे हे निर्णय सरकारला परत घ्यावे लागतील, असे माझे मत आहे. मात्र जर विकास कामांना स्थगिती देवून ते रद्द केले तर सार्वजनिक कामे थांबतील व जनतेचे फार मोठे नुकसान होईल.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….