गायक दलेर मेहंदी यांना 2 वर्षांची शिक्षा ; न्यायालयाच्या सुनावणीनंतर तातडीने अटक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पतियाळा, 14 जुलै :- पतियाळा कोर्टाने गायक दलेर मेहंदी यांना 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. 15 वर्षे जुन्या मानव तस्करी केसमध्ये त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात आज पतियाळा कोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणात सुनावणीदरम्यान कोर्टाने दलेर मेहंदी यांना दोषी करार दिला आहे. काही वेळानंतर शिक्षाही सुनावण्यात आली. कोर्टाच्या निर्णयानंतर तातडीने दलेर मेहंदी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 2003 मध्ये सदर पोलिसांनी बल बेडा गावात राहणारे बक्शीस सिंह हिच्या तक्रारीनंतर दलेर मेहंदीचे भाऊ शमशेर मेहंदी ध्यान सिंह आणि बुलबुल मेहताविरोधात परदेशात पाठवण्याच्या नावाखाली फसवणूक करीत 20 लाख रुपये घेतल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. बातमी अपडेट होत आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….