आरंभी जंगलात बिबट्या हल्यात गाय ठार, नागरिक भयभीत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :- तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या झिरपुरवाडी गावातील गायीचे खांड आरंभी जंगलातून परत येताना बिबट्या ने गायीचा नरडीचा घोट घेऊन ठार केले.
शेतकरी गजानन मगु पवार यांची गाय होती.आरंभी ते खेड रस्त्याच्या कडेला पाणी पिण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने गायीला ठार केल्याची घटना गुरुवारी ५.३० दरम्यान घडली. नागरिकांमध्ये भिंती वातावरण निर्माण झाले. गायीच्या हंबरड्याचा आवाजाने हाकेच्या अंतरावर असलेल्या गुराखी विठ्ठल डहाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता बिबट्याने गायीला ठार केल्याचे पाहिले. वनरक्षक सुशील गुरनुले घटना स्थळी पंचनामा करून शेतकरी गजानन पवार व चौकीदार शरद पवार यांच्या समक्ष गायीचे दफन करण्यात आले. सदर घटनेची माहिती तहसीलदार प्रविण धानोरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी अजय राऊत, यांना सरपंच पुरुषोत्तम कुडवे यांनी दिली.
आरंभी,झिरपुरवाडी जंगलात बिबट्या ने गाय ठार केल्याची घटनेमुळे नागरिकांमध्ये भिंती चे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे कोणाचीही जिवीत हाणी होऊ नये. परिसरातील शेतकरी, शेतमंजुर, महिला व गुराख्यानी सतर्क राहावे.
पुरुषोत्तम कुडवे
सरपंच झिरपुरवाडी

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…