शिवसेनेला मोठा धक्का ; आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आडसूळ यांनी राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. ईडीने केलेल्या कारवाईवेळी तसेच आजारपणात विचारपूसही न केल्याची खंत अडसूळ यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
सिटी कोऑपरेटिव्ह बँक बँकेतल्या कथिक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ यांची चौकशी करण्यात आली होती. ज्यावेळी ईडीने कारवाई केली त्यानेळी पक्षाने साधी विचारपूस केली नाही. तसेच आजरपण, अडचणीच्या काळात देखील पक्ष नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ हे एकनाथ शिंदे गटासोबत अगोदरपासूनच आहेत. आता अडसूळ यांनीही राजीनामा दिला आहे. मात्र अडसूळ शिंदे गटात जाणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. शिवसेनेत नेतेपद हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. शिवसेनेत सध्या नऊ जण हे नेतेपदावर आहेत. दरम्यान, अडसूळ हे को-ऑप क्षेत्रातील मोठे नाव आहे. राज्यातील सर्व सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांची युनियन आहे. अडसूळ हे गेल्या अनेक वर्षांपासून या युनियनचे नेतृत्व करत आहेत.
सिटी को-ऑपरेटीव्ह बँक या बँकेचे अडसूळ अध्यक्ष होते. त्यांचे नातेवाईक हे संचालक मंडळावर होते. या बँकेचा टर्नओव्हर सुमारे 1 हजार कोटींच्या आसपास होता. ही बँक आता दोन वर्षांपासून बुडीत निघाली आहे. कर्ज वाटपात अनियमितता आणि एन. पी. ए. मध्ये झालेल्या घसरणीमुळे बँक डबघाईला आली आहे.
शिंदे यांच्या बंडानंतर ४० आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत. अनेक माजी आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. तसेच आता शिवसेनेचे खासदारही त्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. सेनेचे आज लोकसभेतील आपला प्रतोदही बदलला आहे. भावना गवळी यांच्या जागी राजन विचारे यांची नियुक्ती केली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…