चर्चात चर्चा….! ; शरद पवारांच्या भेटीबाबत एकनाथ शिंदेचं ट्वीट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली हाेती.
ही भेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झाल्याची चर्चा हाेती. या भेटीत दाेन्ही नेत्यांत चर्चा झाल्याची देखील काही माध्यमांतून सांगितले जात हाेते. दरम्यान या भेटीबाबत स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन जनतेपर्यंत माहिती पाेहचवली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माझी भेट झालेली नाही. हे वृत्त संपूर्णपणे चुकीचे असून त्यात अजिबात कोणतेही तथ्य नाही. काहींनी माझे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे एक छायाचित्र व्हायरल केले आहे. ते छायाचित्र मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला गेलो होतो तेव्हाचे आहे. आमच्यात अद्याप अशी कोणतीही भेट झालेली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीच्या वृत्तानंतर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये मुख्यमंत्री शिंदे लिहितात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (साहेब) यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या भेटीच्या चर्चेस पुर्ण विराम मिळाला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…