“महाराष्ट्रात लवकरच पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार” ; व्हॅट बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली.
तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना महाराष्ट्रातील जनतेला लवकरच पेट्रोल डिझेलवर दिलासा देणार असल्याची घोषणा केली.
यापूर्वी केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील कर कपात करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर अनेक राज्यांनी पेट्रोल डिझेलवरील कर कमी केले होते. परंतु महाराष्ट्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील आपले कर कमी केले नव्हते. त्यामुळे राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर अधिकच होते. दरम्यान, आता महाराष्ट्रातील सरकारनं पेट्रोल डिझेलवर लवकरच कर कपात करणार असल्याची माहिती दिली. लवकरच यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार असून राज्यातील जनतेला दिलासा देणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
दिवाळीमध्ये पंतप्रधान मोदींनी पेट्रोल, डिझेलवरील अबकारी कर कमी केला होता. मात्र, ठाकरे सरकारने आम्हाला जीएसटी परतावा दिलेला नाही, यामुळे पेट्रोल, डिझेलवरील कर कमी होणार नाही, अशा शब्दांत कर कपात फेटाळली होती. यामुळे इतर राज्यांत १५-२० रुपयांनी इंधनाचे दर कमी झाले तरी राज्यात मात्र, केंद्राच्याच दर कपातीवर समाधान मानावे लागले होते. पुन्हा दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने अबकारी कर कमी केला, तेव्हा देखील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात व्हॅट कपात करण्यास नकार दिला होता. मोदींना राज्यांनाही कर कपात करण्याचे आवाहन केलं होतं. मोदींसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर ठाकरेंनी त्यास आपला नकार का, हे सांगितलं होतं. तसेच केंद्राच्या दर कपातीवर राज्याचा जो कर कमी झाला तीच आपली दरकपात असल्याचं भासविलं होतं.

अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडून पुरस्कार परत, पुण्यातील ‘टीडीआर’ प्रकरणी नाराजी ; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय….!
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी…
सोलापूरचा महेंद्र ‘हिंद केसरी’; थारसह पटकावली चांदीची गदा, पुण्याचा पृथ्वीराज उपविजेता…..
महाराष्ट्र सरकारचा मोठा डिजिटल निर्णय; मंत्रिमंडळ बैठकींना आता ‘ऑनलाईन’ हजेरीची मुभा….
महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे पडघम; विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा, मतदारसंघांची संपूर्ण यादी…
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, लातूरमधील नामांकित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात…