शरद पवारांना दुसरा धक्का ; महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्रात सत्ताबदल झालेला असतानाच आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे.
भारतीय कुस्ती संघटनेने नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेतला आहे. भारतीय कुस्ती संघटनेचा हा निर्णय शरद पवारांसाठी धक्का आहे. कारण ते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून राज्यात कुस्ती स्पर्धा आयोजित करणे आणि अन्य निर्णय घेतले जातात. राज्यात कुस्ती संचलनासाठी पुढच्या काही दिवसात ॲड हॉक समितीची निवड करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीसह इतर निर्णय घेतले जातील.
बरखास्तीमागची कारणं काय?
भारतीय कुस्ती संघटनेच्या काही प्रस्तावांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, हे सुद्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यामागचं एक कारण आहे. त्याशिवाय राज्यातील मल्लांकडूनही राज्य कुस्तीगीर परिषदेबाबत तक्रारी आल्या होत्या. 15 वर्षाखालील गटासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यास महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, असं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. 23 वर्षाखालील गटासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यासही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद तयार झाली नाही. ही बरखास्ती मागची काही कारणं आहेत.
कुस्तीमध्ये महाराष्ट्राचा मोठा नाव लौकीक
भारतीय कुस्ती संघटनेच्या निर्देशांचे पालन होत नसल्यामुळे संलग्नता रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता. पण महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेकडून अपेक्षित हालचाल न झाल्यामुळे अखेर हा निर्णय घेतला. देशात कुस्तीमध्ये महाराष्ट्राचा एक मोठा नावलौकीक आहे. महाराष्ट्राच्या मल्लांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत.
शरद पवारांसाठी दुसरा धक्का
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची बरखास्ती हा शरद पवारांसाठी धक्का आहे. कारण ते या परिषदेचे अध्यक्ष होते. अलीकडेच महाराष्ट्रात सत्ताबदल झाला आहे. शरद पवार यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच सरकार कोसळलं. त्यांचा पक्ष सत्तेत प्रमुख भागीदार होता. त्या झटक्यानंतर हा दुसरा धक्का मानला जातोय.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…