एकनाथ शिंदे यांच्या बंडात आता फडणवीसांची एंट्री..? ; नवी माहिती आली समोर ; मविआचा खेळ खल्लास…..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 26 जून :- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आहे. या बंडाशी भाजपचा कोणताही संबंध नाही, असं वारंवार सांगितलं जात आहे. पण, आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोर आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून भाजपने अत्यंत सावध आणि शांत अशी भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. पण, भाजपने आमचा कोणताही संबंध नाही असं वारंवार सांगितलं. मात्र, आता गुवाहाटीमध्ये मुक्कामी असलेल्या बंडखोर आमदारांशी देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे गुवाहाटीतील आमदारांना विश्वास देण्यासाठी बोलल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. शनिवारी रात्री जवळपास 15 आमदार फडणवीस यांच्याशी बोलले, असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दुपारच्या सुमारास देवेंद्र फडणवीस हे आता दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, फडणवीस यांची चौथ्यांदा दिल्लीवारी आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोरोनावर मात केली असून सकाळीच त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. राजभवनावर कोश्यारी दाखल झाले आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उदय सामंत एकनाथ शिंदेंच्या गटात सामील दरम्यान, कालपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे शिवसेनेचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत गुवाहाटीला पोहोचले आहे. उदय सामंत नॉट रिचेबल आहेत. उदय सामंत हेदेखील शिंदे गटात सामील झालं असल्याचं सांगितलं जात आहे. सुरतहून विशेष विमानाने उदय सामंत गुवाहाटीला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…