राज्यपालांना आज मिळणार रुग्णालयातून सुट्टी….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आज डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंडखोर आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन करून राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे भाजपला समर्थन देणारे पत्र राज्यपालांना देणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच राज्यपालांना कोरोनाची लागण झाली होती.
सध्या राज्यामध्ये सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरुन राजकीय संघर्ष सुरु असून राज्यपाल सुद्धा या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे राज्यपाल रुग्णालयातून बरे होऊन आल्यावर अनेक राजकीय हालचालींना वेग येऊ शकतो.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेण्याआधीच त्यांना कोरोनाची लागण झाल्याने सत्तास्थापनाचे दावे प्रतिदावे, तक्रारी राजभवनापर्यंत पोहचण्यास आणि त्यासंदर्भातील निर्यणांना विलंब झाला.
मात्र, आता राज्यपाल कोश्यारी यांना डिस्चार्ज मिळणार असल्याने राजकीय हालचालींना वेग येत राज्यातील सत्ता नाट्याला वेगळ वळण मिळू शकते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे बुधवारी दिनांक २२ रोजी गिरगाव येथील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना आज डिस्जार्ज मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.