भाजप नेते अचानक अजित पवारांच्या भेटीला ; चर्चांना उधाण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादीने आपल्या पाच महत्वाच्या नेत्यांची मते मागे ठेवलेली असताना एक मोठी बातमी हाती येत आहे. एक भाजपा नेते, फडणवीसांच्या काळातील महत्वाचे मंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत.
यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. यातच आमदार रवी राणा विधान भवनात पोहोचले आहेत. यामुळे बावनकुळे हे नेमके कशासाठी अजित पवारांना भेटण्यासाठी गेलेत हे समजू शकलेले नाही. दरम्यान, अजित पवार, एकनाथ खडसे आणि बावनकुळेंमध्ये चर्चा सुरु असल्याचे समजते.
आमचेच उमेदवार जिंकतील असे सांगत बावनकुळे यांनी फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सर्वांसाठी उपलब्ध असायचे. आताचे मुख्यमंत्री कुठे असतात, कोणाला भेटतात. यामुळे आमदारच त्याचा बदला घेतील असे बावनकुळे म्हणाले.
शिवसेनेच्या आमदारांची बस लेट झाली होती. वाहतूक कोंडीत अडकली होती. यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी भाजपा, राष्ट्रवादीनंतर मतदान करण्यास सुरुवात केली. शिवसेनेच्या २० आमदारांनी आतापर्यंत मतदान केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारांना कोणाला, कसे मतदान केले याचे मार्गदर्शन केले. परंतू दोन आमदार विधान भवनात आलेच नव्हते. आणखी दोन आजी-माजी मंत्री तुरुंगात असल्याने ही दोन मते देखील राष्ट्रवादीला मिळणार नाहीएत.
विधान परिषद निवडणुकीत आतापर्यंत २०३ आमदारांनी मतदान केले आहे. भाजपाने १०४ हून अधिक आमदारांचे मतदान झाले आहे. तर राष्ट्रवादीने देखील आपल्या आमदारांचे मतदान पार पाडले आहे. परंतू, पाच महत्वाचे नेते मागे राहिल्याने ही नेमकी खेळी कशासाठी या बाबत चर्चांना उधाण आले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….