शिवसेनेचे माजी मंत्री-कॉंग्रेस आमदारामध्ये जुंपली ; समर्थकांमध्ये दगडफेक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जालना :- पानशेंद्रा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल हे आमने सामने आले.
त्यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली.
यावेळी दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये दगडफेक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. १३ जागासाठी ही निवडणूक होत आहे. निवडणूक परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना दोन्ही गटात बाचाबाची झाली आहे.
आक्रमक खोतकर गटाकडून दगडफेक केल्याचा आरोप काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार सामितीवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी या निवडणुकीत दोन्ही गटांत चुरस निर्माण झाली आहे.
अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर आणि आमदार काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात सरळ लढत होत आहे. खोतकर आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आमने सामने आल्याने समर्थकही एकमेकांमध्ये भिडले.
पानशेंद्रा निवडणुकीच्या राड्यानंतर अर्जुन खोतकर म्हणाले, “मतदान शांततेने सुरू आहे. मतदार निश्चितपणे आम्हाला कौल देतील. आत्ता ते पराभूत होणार असल्याने विरोधक असे बोलत आहे,”