मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज लिलावती रुग्णालयात दाखल होणार ; रविवारी शस्त्रक्रिया…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या काही दिवसापुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्या पायावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.
यानंतर राज ठाकरे यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया होणार आहे. पायाचं दुखणं वाढल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना आज दुपारी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
राज ठाकरेंवर उद्या हिप बोनची शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी ते आजच दुपारी काही चाचण्यांसाठी लिलावती रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज या चाचण्या होतील आणि उद्या (रविवारी) शस्त्रक्रिया पार पडेल. दरम्यान, या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांना 2 महिन्यांसाठी घरी आराम करावा लागणार आहे.
दरम्यान, जूनच्या सुरुवातीला शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र त्यांच्या शरीरात कोरोनाचा अंश आढळून आला. त्यामुळे त्यांना भुलीचे इंजेक्शन देणं शक्य नव्हतं. म्हणून ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. हे दुखणं वाढल्यामुळे मे महिन्यातला आपला पुणे दौरा अर्धवट सोडून राज ठाकरे मुंबईला रवाना झाले होते. त्याचबरोबर 5 जून रोजी होणारा अयोध्या दौरा देखील त्यांनी स्थगित केला होता

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….