पंधरा जिल्ह्यांना “यलो अलर्ट” ; 19 ते 21 जूनदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- राज्यातील जूनचा पहिला पंधरवडा मान्सूनसाठी फारसा पोषक नव्हता. मात्र, 19 ते 21 जून या कालावधीत तो वेग घेणार असून, राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’चा इशारा दिला आहे.
दरम्यान, राज्यातील विदर्भासह गुजरात, मध्य प्रदेशमध्ये मान्सून पोहोचला आहे.
यंदा मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र राज्य व्यापले असले, तरीही कमी दाबाचे पट्टे तयार होत नसल्याने बाष्पयुक्त ढगांच्या निर्मितीस खूप वेळ लागत आहे. त्यामुळे मान्सून राज्यात पाऊस पाडण्यात अपयशी ठरतो आहे. मात्र, 19 जूनपासून परिस्थितीत किंचित बदल होत असून, पंधरा जिल्ह्यांना मुसळधारेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातून शुक्रवारी मान्सूनने गुजरात राज्यात प्रवेश केला.
ऑरेंज अलर्ट
– रत्नागिरी : 20 ते 21 जून
– सिंधुदुर्ग : 18 ते 21 जून
– यलो अलर्ट : 19 ते 21 जून
– पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, यवतमाळ , वर्धा, वाशिम.
राज्यातील पाऊस (मिमीमध्ये)
कोकण : वैभववाडी-50, खालापूर-40, वालपोई-30, कणकवली-30, सावंतवाडी-30, रत्नागिरी-20, ठाणे-10
विदर्भ : अकोला-90, खामगाव-50, चिखली-40, बाळापूर-30, तेल्हारा-20, धामणगाव रेल्वे-20, नांदुरा-10,
मराठवाडा : उदगीर-40, जळकोट-40, सोनपेठ-40, वडवणी-30, अहमदपूर-20, मानवत-20, परळी वैजनाथ-20, सेलू-10,
मध्य महाराष्ट्र : खाकरी-20, महाबळेश्वर-20 गुजरखेडा-20
घाटमाथा : लोणावळा, खोपोली, अंबोणे- 10
मान्सूनची प्रगती झाल्याचा हवामान विभागाचा दावा
विदर्भ, गुजरात, मध्य प्रदेशात प्रगती

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….