नगर परिषद निवडणूक आरक्षणावर आक्षेप आमंत्रित…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 15 जून, :- जिल्ह्यातील यवतमाळ, दिग्रस, पुसद, उमरखेड, वणी, आर्णी, दारव्हा व घाटंजी या नगरपरिषदांच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीकरीता दिनांक 13 जून 2022 रोजी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील महिला व सर्वसाधारण प्रर्वगातील महिलांचे आरक्षण सोडत पध्द तीने निश्चित करण्याात आलेले आहे. सदर आरक्षणाची अधिसूचना सबंधीत नगरपालीका कार्यालयाचे सुचना फलकावर तसेच जिल्हााधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयातील सुचना फलकावर व yavatmal.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याात आली असून कार्यालयीन वेळेत पाहण्यारसाठी उपलब्धग करण्यातत आली आहे.
तरी उक्त नगरपरिषद क्षेत्रातील ज्याी रहिवाश्यांना या संबंधात काही हरकती व सूचना दाखल करावयाच्यार असतील, त्यां नी संबंधित नगरपरिषद कार्यालयामध्ये दिनांक 15 जून ते 21 जून 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत कारणासहीत लेखी स्वयरुपात सादर कराव्याधत, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.