मोठी बातमी ; देशमुख आणि मलिकांना मतदान करता येणार नाही ; महाविकास आघाडीला धक्का…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सध्या राज्यात विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकांचे बिगूल वाजलंय. यात सगळेच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. प्रत्येक पक्ष मतांचा आकडा जुळवण्यासाठी मैदानात उतरला आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या अटकेत आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी मलिक आणि देशमुख यांना मतदान करता यावं यासाठी दोघांनी अर्ज केला होता.
मात्र या दोघांचा अर्ज कोर्टाकडून फेटाळण्यात आलाय. यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही.
१० जून दिवशी राज्यसभेची निवडणुक पार पडणार आहे. सध्या राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि भाजप असे सगळेच पक्ष मैदानात उतरले आहेत. यामुळे महाविकास आघाडी विरुध्द भाजप ही लढाई पुन्हा एकदा सर्वांना पाहायला मिळणार आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…