गोदावरी अर्बनचे प्रशासकीय इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते शनिवारी होणार उद्घाटन ; शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीन गडकरी सह अनेकांची उपस्थिती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चे नांदेड येथे प्रशासकीय इमारत (सहकारसूर्य) चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते शनिवार(14) रोजी होणार आहे या सहकार सूर्य इमारतीचे उद्घाटन देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी सह अनेक मंत्री आमदार खासदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार व गोदावरी अर्बन चे संस्थापक हेमंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला आमदार बालाजी कल्याणकर व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर,संचालक व मान्यवर उपस्थित होते.
गोदावरी अर्बन अत्यंत अल्प काळात बँकिंग क्षेत्रात गरुड झेप घेतली असून उत्कृष्ट सेवा देत असल्याने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. विविध राज्यात गोदावरी अर्बन बँकेच्या शाखा असून नांदेड येथील मुख्यालय इमारत सहकार सूर्य चे उद्घाटन शनिवारी सकाळी नऊ वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते होणार असून या सोहळ्याला मान्यवरांसह नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यासह नांदेड,हिंगोली, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यातील आमदार खासदार यांची श्रीमंत उपस्थिती राहणार आहे या उद्घाटन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे अशी विनंती गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा सौ. राजश्री हेमंत पाटील यांनी केली आहे.
उद्घाटन सोहळ्यानंतर होणार सहकार परिषद
इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यानंतर त्याच ठिकाणी सहकार परिषद आयोजित करण्यात आली असून यास रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सतिष मराठे “ग्रहनाअधिकार भारतीय करार कायदा व भारतीय राष्ट्रीय भूगतान निगम सदस्यत्वासाठी आरबीआय व सहकार खात्याची धोरणे” या विषयावर मार्गदर्शन करतील यासह महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर हे “नवीन सहकारी धोरण” यावर मार्गदर्शन करतील तर महाराष्ट्र राज्य पतसंस्था सोसायटीचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे हे “पतसंस्था पुढील आव्हाने व शासनाकडून अपेक्षा” या विषयावर मार्गदर्शन करतील या सहकार परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी केले आहे