मोठी बातमी ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अचानक मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांच्या भेटीला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 6 मे :- राज्यात विविध घडामोडी घडत असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अचानक मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायामूर्ती दिपंकर दत्ता आणि इतर न्यायमूर्तींच्या भेटीसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले. या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्य न्यायाधीशांच्या भेटीमागील नेमकं खरं कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण तरीही ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातंय.
विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी गेल्या वर्षीही मुख्य न्यायाधीशांची भेट घेतली होती. राज्य सरकार आणि कोर्ट यांच्यात समन्वय राहावा यासाठी काही काळाच्या अंतरात मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीश यांच्यात भेटी होत असतात. मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीश यांच्यात कोर्टातील कर्मचारी आणि इतर समस्यांवर चर्चा होऊ शकतात. याशिवाय काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होऊ शकते, अशी चर्चा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीश यांची ही सदिच्छा भेट असली तरी राज्यातील सध्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ निवडणुका घेण्याच्या दिलेल्या निकालाबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावेळी निवडणूक आयोगाने पावसाळ्यापूर्वी निवडणुका घेणे शक्य नसल्याची भूमिका घेतली होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य सरकारसह आणि निवडणूक आयोग यांच्यातील अडचणी वाढल्या आहेत. राज्य सरकार आगामी महापालिका निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्यावर ठाम आहे. या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त मशिदींवरील भोंगे विरुद्ध हनुमान चालीसा या वादावर तोडगा काढण्यासाठी देखील या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…