सोयाबीन बियाण्यांची उगवण शक्ती तपासून पेरणी करावी :- नवनाथ कोळपकर ; कृषी विज्ञान केंद्र येथे किसान मेळावा कार्यक्रम संपन्न…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 29 एप्रिल, :- शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामात सोयाबीन बीयाण्यांची उगवण शक्ती तपासूनच सोयाबीन पिकाची पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.
प्रकल्प संचालक आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ आणि दारव्हा यांचेतर्फे संयुक्तरित्या आयोजित किसान मेळावा कार्यक्रम 26 एप्रिल रोजी कृषी विज्ञान केंद्र येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर बोलत होते तर प्रमुख अतिथी म्हणून उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी जगदीश चव्हाण, कृषी भूषण शेतकरी प्रभाकर ठाकरे, नैसर्गिक शेतीतज्ञ शुभाष शर्मा, प्रगतशील शेतकरी हनुमंतराव देशमुख, कृषी विकास अधिकार राजेंद्र माळोदे, आशीषकुमार साबळे, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक (दारव्हा) डॉ. नंदकिशोर हिरवे उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुरेश नेमाडे, यांनी किसान भागीदारी प्राथमिकता हमारी अभियान अंतर्गत किसान मेळाव्याचे महत्त्व व उद्देश आणि खरीप हंगामातील माती परीक्षणआधारित खत व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले. तर नैसर्गिक शेतीतज्ञ शुभाष शर्मा यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व व बाजारपेठ आधारित पिकांचे उत्पादन आणि जमिनीचा पोत सुधारण्याकरिता हिरवळीच्या खतांचा वापर कसा करावा याविषयी माहिती दिली.
प्रभाकर ठाकरे, जगदीश चव्हाण, हनुमंतराव देशमुख, राजेंद्र माळोदे, डॉ. नंदकिशोर हिरवे, आशीषकुमार साबळे, कीटकशास्त्र शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ डॉ. सुकेशनी वाणे यांनीदेखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन शास्त्रज्ञ देवानंद राऊत यांनी केले तर उपस्थितांचे आभार शास्त्रज्ञ मयूर ढोले यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी व कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…