“तर… राज ठाकरेंची सभा उधळून लावणार”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- औरंगाबाद पोलिसांकडून सभेला परवानी मिळाल्याने सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र त्याच दरम्यान भीम आर्मीने राज ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलीसानी दिलेल्या सूचनांचे, अटींचे पालन न केल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीकडून देण्यात आला आहे.
राज ठाकरेंकडून अटींचं उल्लंघन झाल्यास भीम आर्मीकडून महापुरुषांच्या नावाच्या घोषणा सभेच्या ठिकाणी दिल्या जातील अशी माहिती भीम आर्मीचे नेते अशोक कांबळे यांनी दिली आहे.
सभेदरम्यान कोणत्याही वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळथ असणाऱ्या प्रथा/परंपरा यावरुन कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाचा अपमान होणार नाही, त्याविरुद्ध चिथावणी दिली जाणार नाही, अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कुणीही करणार नाही. याबाबत आयोजक आणि वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी, असंही ते म्हणालेत.
सभेसाठी काही अटी सांगण्यात आल्यात. वाहनांनी शहरात आणि इतर ठिकाणी वेगमर्यादाचे पालन करावे. सभेसाठी येताना-जाताना कार किंवा बाईक रॅली काढू नये.
दरम्यान, यापैकी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आवाजाची मर्यादा असावी. त्या नियमांचा भंग केल्यास 5 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंडांची शिक्षा होऊ शकते.
सभेला येणाऱ्या वाहनांनी पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा, मार्ग न बदलण्याच्या सूचना द्याव्या. सभेदरम्यान बस, मेडिकल, वीज, रुग्णवाहिका अशा इत्यादी अत्यावश्यक सेवांना बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…