राणांच्या जामीन अर्जावर आज सुनावाणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या नवनीत आणि रवी राणा यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे.
राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
राज्य सरकार काय उत्तर देणार?
यापूर्वी 26 एप्रिल रोजी सुनावणी पार पडली होती, त्यावेळी झालेल्या सुनावणी दरम्यान, राणा दाम्पत्याच्या जामीन याचिकेवर 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाच्यावतीने राज्य सरकारला देण्यात आले होते. आज राणा दाम्पत्याच्या जामीन याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयात राज्य सरकार काय उत्तर देणार, हे पाहणे महत्वाचे आहे.
काय आहे प्रकरण?
दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. राणांच्या घोषणेनंतर राज्यभरातून तीव्र पडसाद उमटले. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. अखेर राणांनी आपली घोषणा मागे घेतली, पण त्यानंतर पोलिसांनी राणांना अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत, तर आमदार रवी राणा तळोजा कारागृहात आहेत.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…