राज ठाकरेंच्या सभेसाठी अशा असतील पोलिसांच्या अटी-शर्ती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
आज दुपारी यासंबंधी अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र परवानगी देताना काही अटी आणि शर्ती घातल्या जाणार आहेत.
अशा असतील अटी-शर्थी
-ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे
– लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी
– इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
– सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही
-१ मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये
– व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी
-सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये, वाहन पार्किंगचे नियम पाळावे
-सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही
-सभेला येणार्या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल
-सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये यासह आणखी काही अटी सभेला लागू रहाणार आहेत.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…