शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम….; “आयशा” आत्महत्या प्रकरणात पतीला शिक्षा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अहमदाबाद :- देशभर गाजलेल्या गुजरातच्या आयशा आत्महत्या प्रकरणी कोर्टाने आरोपी पतीला शिक्षा सुनावली आहे.
गेल्यावर्षी 23 वर्षीय आयशाने साबरमती नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने एक व्हिडिओ शूट करुन कुटुंबियांना पाठवला होता. हा व्हिडिओ केवळ गुजरातच नव्हे, तर देशभरात व्हायरल झाला होता.
आरोपी पतीला 10 वर्षांची शिक्षा
आयशा आत्महत्या प्रकरणी गुजरातमधील अहमदाबाद सत्र न्यायालयाने पती आरिफला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आयशाने 25 फेब्रुवारी 2021 रोजी साबरमती नदीत उडी मारुन आत्महत्या केली होती. त्या घटनेनंतर पती राजस्थानमध्ये पळून गेला होता. 1 मार्च रोजी त्याला पाली येथून अटक करण्यात आलो होती. त्याला आता न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
नेमकं काय झालं होतं?
मूळची राजस्थानची असलेली आयशा लग्नानंतर तिच्या पतीसोबत अहमदाबादच्या वाटवा येथे राहत होती. 23 वर्षीय आयशाचा विवाह 2018 मध्ये राजस्थानमधील जालोर येथील आरिफसोबत झाला होता. आरिफचे राजस्थानमधील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. आयशासमोर आरिफ प्रेयसीशी व्हिडिओ कॉलवर बोलत असे. यामुळे गरोदरपणात आरिफच्या वागण्याने आयशा तुटली होती. ती डिप्रेशनमध्ये गेली होती. तिचे मूलही गर्भातच मरण पावले. दोघांमध्ये नेहमी भांडणे होत असत. रोजच्या भांडणाला कंटाळून तिने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.
व्हिडिओ व्हायरल
साबरमती नदीत उडी मारण्यापूर्वी आयशाने एक व्हिडिओ आपल्या कुटुंबीयांना पाठवला होता. तो व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला. त्या व्हिडिओत आयशा म्हणाली होती, “आरीफ आय लव्ह यू. मी नेहमी तुझ्यावर प्रेम करत राहीन. ही सुंदर नदी तिच्या मला मिठीत घेईल, अशी मी प्रार्थना करते.” आयेशाच्या मृत्यूनंतर हे प्रकरण हुंड्यासाठी छळाचे असल्याचे निष्पन्न झाले होते.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…