सत्ताधारी आणि विरोधकांनी भोंग्या वरून समाजात तेढ निर्माण करणं थांबबावं , अन्यथा….; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा पुण्यात इशारा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने दोन समाजात तेढ निर्माण करणे थांबवावे, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाने म्हटले आहे.
भोंग्यांच्या प्रकरणावरून मराठा क्रांती ठोक मोर्चाने सरकारवर टीका केली आहे. यानिमित्ताने भोंग्यांच्या वादातही उडी घेतली आहे. भोंगे प्रकरणावरून राज्यात वाद थांबला नाही, तर मराठा क्रांती ठोक मोर्चा रस्त्यावर उतरेल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे देण्यात आला आहे. सध्या राज्यात भोंग्यांचा विषय तापला असून विविध पक्ष आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सदावर्ते यांची सनद रद्द करण्याच्या मागणीसाठी लवकरच बार कौन्सिलच्या अध्यक्षांची भेट घेणार असल्याचेही मराठा क्रांती मोर्चातर्फे सांगण्यात आले आहे.
एक मेला होतेय राज ठाकरेंची सभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या या सभेला काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. त्यात मराठा क्रांती मोर्चाने उडी घेतली आहे. हा वाद म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. हे जर थांबले नाही, तर मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
सदावर्तेंविरोधात आक्रमक
गुणरत्न सदावर्ते यांना शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या हल्लाप्रकरणानंतर ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची रवानगी सातारा पोलिसाांच्या ताब्यात होती. मग तिथून त्यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला होता. दरम्यान, यानंतर कोल्हापूर आणि साताऱ्यातून जामीन मिळाल्यानंतर सदावर्ते यांना आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आले होते. तिथेही पुणे पोलीस सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाली असून अशाप्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या माणसाची सनद रद्द करावी, या मागणीसाठी बार कौन्सिलकडे जाण्याचीही तयारी मराठा क्रांती ठोक मोर्चा करीत आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..