सभेचे “उत्तर” सभेनेच ; आता झाली एकत्रीत महाविकास आघाडी ; पुण्यात होणार 30 ताराखेला जाहीर सभा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे, 27 एप्रिल :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी जाहीर सभा होणार आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे खाली उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
त्यामुळे त्यांच्या औरंगाबादच्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं आहे. मनसे भोंग्यांच्या मुद्द्यावरुन ठाम असल्याचं चित्र आहे. राज ठाकरे यांनी याआधी घेतलेल्या सभेमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर मिश्किल पद्धतीत आणि खोचक शब्दांमध्ये टीका केली होती. येत्या सभेतही ते तशाप्रकारची टीका करु शकतात.
पण राज ठाकरे यांच्या सभांना आता महाविकास आघाडी सरकारमधील तीनही घटक पक्ष रोखठोक उत्तर देण्याची शक्यता आहे. कारण भोंगे आणि हनुमान चालिसाला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून पुण्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा 30 एप्रिलला पुण्यातील अलका टॉकिज चौकात होणार आहे. या सभेला तीनही पक्षांमधील नेते आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यावेळी पुण्यातच असणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची औरंगाबादमध्ये सभा आहे. ते पुण्याहूनच औरंगाबादला सभेसाठी जाणार आहेत. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्यात घेतलेल्या सभेत महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांवर खोचक शब्दांमध्ये टीका केली होती.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचं ‘जंत’ पाटील असा उल्लेख करत खिल्ली उडवली होती. याशिवाय त्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही टोला लगावला होता. राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला होता.
राज ठाकरे यांनी केलेल्या या टीकेला नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. राष्ट्रवादीच्या संकल्प यात्रेत त्यांनी राज ठाकरे यांचा ‘खाज’ ठाकरे असा उल्लेख केला होता. मिटकरींनी त्या भाषणात राज ठाकरेंवर सडकून टीका केली होती. त्यांचं ते भाषण वादग्रस्त ठरलं होतं.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे एकट्या मिटकरींनी राज ठाकरे यांच्यावर केलेली टीका मनसेच्या प्रचंड जिव्हारी लागली होती. त्यामुळे तीन पक्षांची एकत्र सभा झाली तर मनसे आणि भाजपवर काय-काय टीका-टीप्पणी आणि आरोप होतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला अद्यापही पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही मनसेकडून सभेची जय्यत तयारी सुरु आहे.
विशेष म्हणजे सभेआधी राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असणार आहेत. तिथे राज ठाकरे यांच्या सभेबाबत नियोजन होणार आहे. तसेच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचंही नियोजन केलं जाणार आहे. राज ठाकरे जेव्हा पुण्याहून औरंगाबादला जाणार तेव्हा 150 ते 200 गाड्यांचा ताफा असणार आहे. याशिवाय एक लाख नागरिक सभेत असणार असल्याचा दावा केला जातोय.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…