नवनीत राणांना ८० लाखांचं प्रकरण भोवणार….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याची मागणी केल्यानंतर या सर्व प्रकरणात आता राजकीय नाट्य रंगलं आहे.
खासदार नवनीत राणा यांनी दाऊदशी संबंधित युसूफ लकडावाला याच्याकडून 80 लाखांचं कर्ज घेतलं, असा सनसनाटी आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय.
नवनीत राणा यांनी घेतलेल्या कर्जाबाबत ईडीनं तपास करायला हवा. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय. ईडी (ED) या प्रकरणाची चौकशी करेल का? असा सवालही त्यांनी ट्विटद्वारे उपस्थित केलाय.
यानंतर राणांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं कळतंय. लकडावाला याच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचे पुरावे समोर आल्यास त्यांच्याविरोधात तक्रार दाखल होऊ शकते. यानुसार राज्याची आर्थिक गुन्हे शाखा राणांवर कारवाई करण्याची शक्यता आहे.

राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. कलम १२४ अ अंतर्गत ही कारवाई करण्यात आलीय. यासोबतच पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा गुन्हाही त्यांच्यावर दाखल आहे, आता आणखी एका गुन्ह्यात त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 सुरू राहणार, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द…; कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारचे 14 धडाकेबाज निर्णय..…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण…..
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच – राजू शेट्टी…..
राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा ; यलो अलर्ट जाहीर…..
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….