कृषी निविष्ठा तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष स्थापण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 26 एप्रिल, :- कृषी निविष्ठांची जादा दराने विक्री करणे, मुदतबाह्य कृषी निविष्ठांची विक्री करणे, साठेबाजी करणे किंवा अनाधिकृत कृषी निविष्ठांची विक्री करणे अशा प्रकारच्या तक्रारींचे वेळीच निराकरण करून शेतकऱ्यांना गुणवत्तापुर्ण कृषी निविष्ठा उपलब्ध होण्याकरिता जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापण करण्यात आला आहे.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे स्थापण करण्यात आलेल्या या नियंत्रण कक्षातर्फे खरीप हंगामात सन 2022 मध्ये गुणवत्ता नियंत्रण मोहिमेंतर्गत कृषी निविष्ठेच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येईल. संबंधीतांनी 9405140150 या भ्रमणध्वनी क्रमांकावर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांचेकडे आपल्या तक्रारींची नोंद करावी, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी कळविले आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…