आत्महत्याग्रस्त एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला कधी भेटले नाही पण….; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मागील काही दिवसांपासून सदावर्ते दाम्पत्य, शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला, राणा दाम्पत्य, हनुमान चालिसा आणि भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला यामुळे महाराष्ट्राच राजकारण ढवळून निघालं आहे.
त्यातच उद्धव ठाकरे यांनी रविवारी ज्येष्ठ शिवसैनिक आजीची भेट घेतली. यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.
हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही तर मग काय पाकिस्तानात जावून म्हणायची का असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला. राज्य सरकारने भोंग्यांबाबत बोलविलेल्या बैठकीला न जाता फडणवीसांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान मुख्यमंत्री कुठल्या तरी आजीच्या भेटीला जातात. ते अशा अविर्भात जातात जस काही युद्ध जिंकलं. एसटी संपातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची किंवा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेतली असती तर समजू शकलो असतो. असो पण आजीकडे गेल्यावर आजीने काय सुनावलं हे आपण सर्वांना पाहिलं, असंही फडणवीस यांनी म्हटलं.
‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठण कऱण्यासाठी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा येणार होते. त्यांना विरोध करण्यासाठी शिवसैनिकांमध्ये ८० वर्षांच्या शिवसैनिक आजी देखील सामील झाल्या होत्या. ‘झुकेगा नही’ म्हणत या आजींनी आंदोलनात सहभाग नोंदवला होता. आजीचा पुढाकार पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आजीच्या घरी भेट दिली होती.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….