औरंगाबाद संवेदनशील शहर ; राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये :- प्रकाश आंबेडकर……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांवरून घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे.
राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याला शिवाजी पार्कवर आणि दुसरी सभा ही ठाण्यामध्ये घेतली. दोन्ही सभांंमध्ये त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. तर ठाण्यातील सभेत भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला. आता राज ठाकरे आपली तिसरी सभा ही औरंगाबादमध्ये घेणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. मात्र अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे.
राज ठाकरेंच्या सभेला लहान संघटनांनी विरोध केला असून आम्ही लहान – सहान संघटनांकडे लक्ष देत नाही.
काहीही झालं तरी सभा ही होणार अशी भूमिका मनसेने घेतली आहे. दुसरीकडे, औरंगाबाद हे संवेदनशील शहर आहे.
राज्यातील शांतता बिघडू नये आणि दंगली घडू नयेत म्हणून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये,
असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
—
राज ठाकरेंनी आधीच औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे.
मात्र आता संघटनांनी त्यांच्या सभेला विरोध दर्शवला आहे.
अशातच आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनीही विरोध दर्शवल्यामुळे आता सभेला परवानगी मिळणार की नाही यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्या पक्षाला मोठा फटका बसलेला आहे.
मनसेमधील मुस्लिम कार्यकर्त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे, राज ठाकरेंना याचं नुकसान येणाऱ्या महापालिका निवडणुकीत होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….