राज्याला नवे गृहमंत्री मिळणार…? ; “या” नेत्यांचे नाव आघाडीवर…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून राज्याच्या गृहमंत्री पदावरून दिलीप वळसे पाटील यांना हटवले जाणार असल्याची चर्चा आहे.
गृहखाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार असून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हातात गृहखात्याचा कारभार दिला जाण्याची शक्यता आहे. १ मे पूर्वी हा बदल होऊ शकतो.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांवर ईडी कारवाई होत असताना गृहखात्या कडून म्हणावा तसा पलटवार भाजप नेत्यांवर केला जात नसल्याची तक्रार यापूर्वी देखील सरकारमधील नेत्यांकडून केली जात होती. तेव्हापासूनच गृहमंत्री पद दुसऱ्या कोणाला तरी देण्याबाबत चर्चा रंगल्या होत्या. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील यापूर्वीच गृहखात्याबाबत उघड नाराजी व्यक्त करत म्हंटल होत कि, गृहखात्याने दमदार पाऊले टाकली पाहिजेत, अस्ते कदम भूमिका घ्याल तर स्वतःभोवती तुम्ही फाशीचा दोर आवळत आहात असा इशारा त्यांनी दिला होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही एका कार्यक्रमात बोलताना म्हंटल होत की , वळसे पाटील साहेब, गृहखात्याचा हिसका दाखवा आणि भाजपच्या २-४ नेत्यांना तुरुंगात टाका, आधीच हे काम केलं असत तर आज परिस्थिती आली नसती असे म्हणत त्यांनी वळसे पाटलांचे कान टोचले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता गृहमंत्री बदलाच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत.

देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग, थेट गुप्त बैठक….
मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणारा लढवय्या हरपला, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन….
स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! सवलत घेणाऱ्या राखीव उमेदवारांना ‘ओपन’मधून संधी नाही; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय….
‘HSRP’नंबर प्लेटसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत मुदत, नियम मोडल्यास…
महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरात 3.14 रुपयांनी वाढ..?