राज्यातील विद्यापीठे , महाविद्यालये ऑफलाईन सुरु होणार :- उदय सामंत…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता दिल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे विद्यापिठ कॅम्पस बंद होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा विद्यापीठे, महाविद्यालये सुरु व्हावीत अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. दरम्यान आज उदय सामंत यांनी याबाबत ट्विट करत निर्णय जाहीर केला आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे विद्यापिठ कॅम्पस बंद होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत.

ते म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता दिली. लसींच्या दोन मात्रा न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने क्लास उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली.
त्याचबरोबर राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत (RUSA) ३७ कोटी ५८ लाख ३३ हजार इतका निधी राज्य प्रकल्प संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….