मुंबई महापालिकेसमोर एसटी कर्मचाऱ्यांचा ठीय्या ; पोलिसांची तारांबळ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या ऑक्टोबर महिन्यापासूनपासून आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आझाद मैदानामध्ये सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये मुंबई महानगर पालिकेकडून मूलभूत सुविधा मिळत नाहीत.
त्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
मुंबई महापालिका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एसटी कर्मचाऱ्यांनी मुलभूत सोयी सुविधांसाठी आंदोलन सुरु केल आहे. कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिकेसमोर (BMC) आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी आझाद मैदानात जाण्याची विनंती केली. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन सुरु केलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळं पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बळ मागवलं. पोलिसांकडून एसटी कर्मचाऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रस्त्याच्या मध्यभागी येऊन एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. पोलिसांच्या तीन ते चार गाड्या घटना स्थळावर पोहोचल्या आहेत. पोलिसांनी वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत. मुंबई महापालिकेसमोर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केलंय. पोलीस आंदोलकांना आवरण्याचा प्रयत्न करत आहेत.
गेल्या ऑक्टोबर महिन्यापासूनपासून आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आझाद मैदानामध्ये सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये मुंबई महानगर पालिकेकडून मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आज एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाबाहेर चक्काजाम आंदोलन सुरु केलं आहे. पिण्याचे पाणी आणि शौचालय नसल्यामुळं हे आंदोलन केलं जात आहे. मुंबई महानगरपालिकेसमोर असलेला रस्ता पूर्णपणे एसटी कर्मचाऱ्यांनी जाम करुन टाकला आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….