तुरुंगात अनिल देशमुख पडले ; उपाचारांसाठी जे.जे रुग्णालयामध्ये दाखल ; शस्त्रक्रिया होणार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. शुक्रवारी ही घटना घडली होती. कारागृहात चालत असताना ते पडले आणि त्यामुळे त्यांच्या खांद्याला मार लागल्याची माहिती मिळत आहे.
सध्या देशमुखांना उपाचारांसाठी जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे.
अनिल देशमुखांना उपचारांसाठी शुक्रवारीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख जेलमधील बाथरूम मध्ये घसरून पडले. तेव्हापासून ते रुग्णालयात आहेत. आज त्यांचा MRI काढण्यात आला आहे. चालत असताना पडले आणि त्यामुळे त्यांचा खांदा डिसलोकेट झाला आहे. त्यामुळे त्यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शुक्रवारी त्यांना जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
अद्याप यासंदर्भातील आणखी माहिती मिळाली नसून यासंदर्भातील सविस्तर माहिती जे जे रुग्णालयाकडून देण्यात येणार आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…