सोमय्यांचा पुन्हा बॉम्ब…. ; पुन्हा एक मंत्री रडारवर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांवर आरोप-प्रत्यारोपही होताना दिस आहे, अशात भाजपचे किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे गंभीर आरोप केलेत.
दरम्यान सोमय्यांनीSomaiya ट्विट करत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ परिवारावर 158 कोटींचा घोटाळयाचा आरोप करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे सोमय्यांनी ट्विट करत मुश्रीफ परिवार घोटाळ्याबाबत आणखी एक बॉम्ब फोडला आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या? हसन मुश्रीफ परिवार १५८ कोटींचा घोटाळा..हसन मुश्रीफ यांचा मुलगा, जावई आणि इतर 7 जणांविरुद्ध पोलिस एफआयआर FIR नोंदवण्यात येणार आहे, पोलीस चौकशी व कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. ED आणि आयकर विभागाने याप्रकरणी कठोर कारवाई करावी यासाठी मी पाठपुरावा करत आहे. असं लिहल आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या Somaiya यांनी अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा घेऊन नुकताच दापोली दौरा केला होता. या दौऱ्यानंतर किरीट सोमय्यांच्या रडारवर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळा प्रकरणात कारवाईसाठी किरीट सोमय्या यांनी पुण्यात दंड थोपटल्याचेही दिसले. हसन मुश्रीफ यांनी 158 कोटींचा घोटाळा केला असून हा पैसा 47 कंपन्यांमधून आला आहे. यामध्ये शेल कंपन्या देखील आहेत, असे देखील किरीट सोमय्यांनी Somaiya माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….