राज ठाकरेंच्या टीकेला पुतण्या आदित्य ठाकरे यांच्या उत्तर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- कोरोनाच्या दोन वर्षांनंतर होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं.
विधानसभा निवडणुकांनंतर भाजप सोबत न राहता महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं यावरुन राज ठाकरे यांनी टिका केली. अशातच आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेवर केली आहे. मनसे ही भाजपची’सी’ टीम असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केलीय. ई सकाळनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
काही पक्षांना मी टाइमपास पक्ष म्हणत होतो. आता तरी त्यांना थोडे काम मिळाले आहे. एमआयएम ही भाजपची ‘बी’ टीम, तर मनसे ही ‘सी’ टीम आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मनसेवर निशाणा साधला आहे. जो पक्ष इतकी वर्ष भूमिका स्पष्ट करू शकला नाही, त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचे, असा टोलाही त्यांनी यावेळी लागवला आहे.
मविआ सरकार स्थापनेवरुन राज ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेशिवाय सरकार स्थापन होणार नाही हे कळल्यानंतर शिवसेनेने भाजपसमोर मुख्यमंत्रीपदावर अडीच वर्षाचा दावा केला. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा चार भिंतीआड का झाली? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्यातील विधानसभेची मागील निवडणूक आठवा, सोबत कोण होतं आणि विरोधात आहे.
पळून गेले एकाबरोबर आणि लग्न कुणाबरोबर कळेनाच. निकाल लागल्यावर उद्धव ठाकरे यांना साक्षात्कार कसा झाला की अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची ठरली होती. आधी जाहीर सभेत का नाही बोलले. अमित शाह यांच्याशी बंद दाराआड का बोलणं केलं?
दुसरीकडे अशी चर्चा झाली नसल्याचे अमित शहा यांनी सांगितलं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. जनतेने भाजप-शिवसेना युतीला मतदान केलं होतं महाराष्ट्राने असं राजकारण पाहिलं नाही. एकमेकांना टीका करणारे आज मांडीला मांडी लावून बसले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला मतदान केलं होतं.
मग सरकार महाविकास आघाडीचं का? मतदारांनी युती म्हणून तुम्हाला मतदान केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायला मतं नाही दिली. राज्यातील जनतेशी गद्दारी का केली?
मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही काय शिक्षा देणार? अशी विचारणा राज ठाकरे यांनी जनतेला केली.
महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष भाजप, दोन नंबरचा पक्ष शिवसेना आणि तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी असं असताना तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवतोय, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. दाऊदशी संबंध असणारे नवाब मलिक जेलमध्ये, पहिलं मंत्रिपद छगन भुजबळ यांना जाहीर केलं तेही दोन वर्षे जेलमध्ये होते. हे सगळं नाकावर टीच्चून केलं जातं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….