राज ठाकरेंच्या भाषणावर इम्तियाज जलील म्हणाले “त्या भाषणावर कोणतीही प्रतिक्रिया नाही” ; असदुद्दीन ओवेसीनेही प्रतिक्रिया देणं टाळलं….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. यावर आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली. तर मुंबईच्या महापैार किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेच्या भाषणावर सडकून टीका केली आहे.
पण असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षानं मात्र राज ठाकरेंच्या भाषणावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पत्रकारांनी राज ठाकरेंच्या भाषणावर इम्तियाज जलील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले,’राज ठाकरेंच्या भाषणावर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना मीच महाराष्ट्रातील आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. सध्या आम्हाला त्यावर काही बोलायचं नाहीय’असं म्हणत जलील यांनी राज ठाकरेंच्या कोणत्याही वक्तव्यावर बोलायचं नाही अशी भूमिका जलील यांनी घेतली आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..