“शिवसेनेने आता पुन्हा महायुतीत यावे” ; आठवलेंचें उद्धव ठाकरेंना आमंत्रण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
परभणी :- ”महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाही. काँग्रेसचे आमदार नाराज आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेने आता पुन्हा महायुतीत यावे.
अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा फार्म्युला होऊ शकतो”, असे म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महायुतीत येण्याचे निमंत्रणच दिले. ते शनिवारी (ता. दोन) येथे पत्रकारांशी बोलत होते.
भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) वतीने राज्यभरात पक्ष संघटना बांधणी व कार्यकर्त्यांना जागृत करण्यासाठी पक्षाचे प्रमुख तथा केंद्रीय राज्यमंत्री आठवले हे गाठीभेटी घेत आहेत. शनिवारी ते परभणी शहरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ”सध्या काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट समसमान निधी वाटपावरून नाराज आहे. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही. त्यामुळे लवकरच राज्यात भाजप परत सत्ता स्थापन करेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजप-शिवसेना युतीसंदर्भात बोलताना त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना महायुतीत परत येण्याचे निमंत्रणच दिले. ते म्हणाले, ”अजूनही अनेक निष्ठावंत शिवसैनिकांची भाजप सोबत जाण्याची इच्छा आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परत एकदा विचार करून महायुतीत यावे. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युल्याचा विचार होऊ शकतो.”
ठाकरे, पवार कुटुंबीयांबद्दल आदरच
केंद्रीय तपास यंत्रणांनी गेल्या काही दिवसांत राज्यात केलेल्या कारवायांच्या प्रश्नावर बोलताना आठवले म्हणाले, ”या यंत्रणा कोणाच्या दबावाखाली काम करत नसतात. ज्याचे व्यवहार पारदर्शी नसतात, त्यांचीच चौकशी या यंत्रणा करतात. ठाकरे व पवार कुटुंबीयांच्या निकटवर्तीवर झालेल्या कारवाया या द्वेषभावनेतून झालेल्या नाहीत. उलट ठाकरे व पवार कुटुंबीयांबद्दल आम्हाला नेहमीच आदर आहे.”

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…